Skip to main content

Posts

Recent posts

हनुमानाचा जन्म

जेव्हा अग्नी देवाने अयोध्येचे महाराज दशरथ यांना आपल्या राण्यांमध्ये वाटण्यासाठी खीर दिली जेणेकरून त्यांच्या घरात अलौकिक आणि अद्भुत मुलांचा जन्म व्हावा, तेव्हा त्या खिरीतील छोटासा हिस्सा एका घारीने पळवला आणि जिथे अंजनी तपश्चर्या करत होती तिथे घेऊन गेली. वायू देवाने त्या खिरीचा एक थेंब अंजनीच्या ओंजळीत टाकला. जेव्हा तिने त्या खिरीच्या थेंबाचे सेवन केले तेव्हा तिच्या गर्भातून हनुमानाचा जन्म झाला. अशा प्रकारे भगवान शंकराने वानराचे रूप घेतले आणि माता अंजनीच्या गर्भातून हनुमानाच्या रूपाने जन्म घेतला

अहिरावण

अहिरावण हा रावणाचा भाऊ होता आणि तो पाताळ लोकावर राज्य करीत होता. आणि त्याने जादू आणि फसवे भास निर्माण करण्याच्या कलेत नैपुण्य मिळवले होते. जेव्हा इंद्रजिताचा मृत्यू झाला आणि रावणाला आपला पराभव डोळ्यासमोर दिसू लागला तेव्हा त्याने अहिरावणाला आपल्या मदतीला पाचारण केले. अहिरावणाने रावणाला वचन दिले की तो राम आणि लक्ष्मण यांना जिवंत पकडेल आणि महामाया देवीला त्यांचा बळी चढवेल. बिभीषणाला अहिरावणाच्या या हेतूंविषयी माहिती मिळाली आणि त्याने जाऊन राम आणि लक्ष्मण यांना या गोष्टीची कल्पना दिली आणि हनुमानाला अहिरावणावर नजर ठेवायला सांगण्यात आले. बिभीषणाने हनुमानाला सावध केले की अहिरावण कोणतेही रूप घेऊ शकतो त्यामुळे त्याच्यापासून सावध राहा. अहिरावणाने अनेक वेग - वेगळी रूपे घेऊन राम आणि लक्ष्मणाच्या महालात घुसण्याचा प्रयत्न केला परंतु हनुमानाने त्याला प्रत्येक वेळी पकडले. शेवटी त्याने बिभिशणाचे रूप घेतले आणि या वेळी मात्र हनुमानाने त्याच्यावर विश्वास ठेवला. आणि म्हणून तो राम आणि लक्ष्मणाच्या महालात जाऊ शकला आणि राम आणि लक्ष्मणाला पाताळ लोकात घेऊन जाण्यात यशस्वी ठरला. जेव्हा हनुमानाला माहिती पडले की अह...